close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळणार - रोहित पवार

 काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत नक्कीच यश मिळेल असा विश्वास नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला.  

Updated: May 22, 2019, 09:37 PM IST
काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळणार - रोहित पवार

पुणे : काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत नक्कीच यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत जायचा निर्णय हा वैयक्तिक कारणामुळे घेतला असून त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.  

पक्ष कोणी सोडून जात असेल तर त्या गोष्टीला जास्त महत्त्व देणे मला योग्य वाटत नाही, असेही ते म्हणालेत. वंचित बहुजन आघाडीमुळे जर आघाडीची मते विभागली गेली तर भविष्यात प्रकाश आंबेडकर आघाडीसोबत येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.