पुण्यात २ टप्प्यात मतदान, पवारांच्या बारामतीवर शहांचा डोळा

अमित शहांना जिंकायची आहे बारामती...

Updated: Mar 11, 2019, 02:29 PM IST
पुण्यात २ टप्प्यात मतदान, पवारांच्या बारामतीवर शहांचा डोळा title=

मुंबई : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर देशभरात आचार संहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांवर, 18 एप्रिलला 10 जागांवर, 23 एप्रिलला 14 जागांवर तर 29 एप्रिलला 17 जागांवर मतदान होणार आहे. पुण्यात पहिल्यांदा 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पुणे आणि बारामतीमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे. मावळ आणि शिरूरमध्ये 29 एप्रिलला मतदान होणार आहे. राजकीय विश्लेषकांचा माहितीनुसार, पुण्यात 2 टप्पाय मतदान होणार असल्याने निवडणुकीच्या आधी प्रचाराला वेळ मिळणार आहे. यामुळे काही समीकरणं बदलू शकतात. मागच्या वर्षी मोदी लाटेत पुण्यात शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार विजयी झाले होते.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला 

पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण मागच्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीला फटका बसला होता. पुण्यातून भाजपचे अनिल शिरोळे खासदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या विश्वजीत पतंगराव कदम यांचा पराभव केला होता.

बारामतीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. येथून सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना येथे पाठिंबा दिला होता. त्यांना राष्ट्रवादीला येथे मोठी टक्कर दिली होती. 

मावळ मतदारसंघातून शिवेसनेचे श्रीरंग चंदू बर्ने खासदार आहेत. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर हे 2014 मध्ये तिसऱ्या स्थानावर होते. शिरूर मतदारसंघातू शिवसेनेचे शिवाजी राव पाटील विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे देवदत्त निकम दुसऱ्या स्थानावर होते.

पवारांच्या बारामतीवर शहांचा डोळा

आजतकच्या बातमीनुसार, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना शरद पवार यांच्या बारामतीत भाजपचा झेंडा रोवायचा आहे. आतापर्यंत त्यांना येथे अनेक दौरे केले आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं ध्येय त्यांना ठेवलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'खरा विजय तेव्हा मानेल जेव्हा बारामतीतून भाजपचा उमेदवार निवडून येईल.'