पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे येथे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक दिवस चर्चा रंगली होती. पण शिवसेनेने भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी दिली. तर श्रीनिवास वनगा यांना विधीमंडळात पाठवणार असल्य़ाचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा आणि भाजपच्या राजेंद्र गावित यांच्यातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पण राजेंद्र गावित यांचा विजय झाला होता. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
२०१८ च्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांना २ लाख ७२ हजार ७८२ मते मिळाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला. यामध्ये श्रीनिवास वनगा यांना २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली होती. तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना २,२२,८३८ मते तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला ७१ हजार ८८७ मते काँग्रेसच्या दामू शिंगडा यांना ४७७१४ मते मिळाली होती.
राजेंद्र गावित यांना हितेंद्र ठाकूर हे टक्कर देतांना दिसणार आहेत. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आणि सीपीआयने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत युती विरुद्ध ही महाआघाडी असा सामना रंगणार आहे.
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
चिंतामन वनगा | भाजप | 533201 |
बळीराम जाधव | बहुजन विकास आघाडी | 293681 |
खरपडे लाडक्या रुपा | कम्युनिस्ट पक्ष | 76890 |
नोटा | नोटा | 21797 |
पांडुरंग जेठ्या पारधी | आप | 16182 |