दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीका

Jitendra Avhad On Udaynraje: 'दिल्लीच्या तक्तापुढे 4 दिवस नतमस्तक होऊन मला तिकीट द्या' हे राजेंनाही आवडलं नसेल, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.

Updated: Apr 16, 2024, 06:48 PM IST
दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीका title=
Jitendra Avhad On Udaynraje bhosle

Jitendra Avhad On Udaynraje: सातारा लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना तिकीट देण्यात आलंय. यानंतर उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केलीय. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. भोसले गादी बद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. मग ती कोल्हापूरची गादी असो या साताराची गादी असो. वंशपरंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्यांची गादी आहे. ती कशाप्रकारे सांभाळली पाहिजे? काय आचार विचार आणि कृत्य? हे महाराष्ट्राला माहिती असल्याचा टोला आव्हाडांनी लगावला. यांची कृत्य दुष्कृत्य साताऱ्याने आणि सगळ्यांनी पाहिली आहेत. त्यामुळे आधीचा सन्मान राहीला नसल्याचे आव्हाड म्हणाले.

'दिल्लीच्या तक्तापुढे 4 दिवस नतमस्तक होऊन मला तिकीट द्या' हे राजेंनाही आवडलं नसेल. एक नेतृत्व महाराष्ट्रात जन्माला आलं, त्यांनी कायम दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिल. दुसरीकडे केवळ लोकसभेमध्ये उमेदवारी मिळावी ते दिल्लीत जाऊन तिकीट द्या तिकीट द्या करत होते, असे आव्हाड म्हणाले. 

महाराष्ट्राची परंपरा आहे. आजही सर्व मान त्या गादीला जातात. त्या गादीची किमान तरी इज्जत ठेवायला हवी होती. आपण कोणासमोर झुकतो आहोत? हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. 

शशिकांत शिंदे खरा रयतेचा प्रतिनिधी 
शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे. त्यांच्या घरची परिस्थिती काय होती हे राजेंनाही माहिती आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद,हिम्मत, कर्तुत्व आहे, त्यांना मोठं केलंय. त्याचा वारसा काय हे कधीच बघितलं नाही.  
शशिकांत शिंदे हा गरीब घरातला माथाडी कामगार आहे. असे असताना त्यांनी राजेंना अंगावर घेतले आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहे. शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात. सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाहीत असे ते उदयनराजेंना उद्देशून म्हणाले. 

शाहू महाराजांना जसं घरी बसून तिकीट दिलं. त्यांना कुठे 'तिकीट द्या तिकीट द्या' करत फिरावं लागलं नाही. साताऱ्याच्या गादीचा इतिहास फार मोठा आहे. अशाप्रकारे तिकीट मिळवणं म्हणजे त्या गादीचा अपमान असल्याची टीका आव्हाडांनी केली. 

तुम्ही ज्याचा वारसा सांभाळता त्या गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिलं होतं, त्या गादीवर बसलेला वारसा हक्क जपलेला हा जर दिल्ली पुढे नतमस्तक होत असेल तो तुमचा नाही तर उभ्या महाराष्ट्राचा अपमान असल्याचे आव्हाड म्हणाले. 

'100% व्हीव्हीपॅट'
नवनीत राणांनी भाजपला घरचा आहेर दिला. मोदींची हवा नाहीये. अमरावतीत आपली विकेट पडणार आहे, हे त्यांना आता जाणवू लागलं आहे. मतदान हे  100% व्हीव्हीपॅट मोजून करा. एकदा दूध का दूध पाणी का पाणी करून टाका. तिनेही मागणी करावी. आम्ही तिच्या मागणीला मी समर्थन देतो. 2 वाजेपर्यंत निकाल आले पाहिजेत लवकर निकाल आले पाहिजेत अशी तुम्हाला घाई का?  निवडणुका 3 महिने चालवायच्या आणि मतमोजणी करताना ते दहा तासातच आटपला पाहिजे हा आग्रह का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.