सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. चोरट्यांनी चक्क जिल्हा परिषद सदस्या सावी लोके यांच्या घरी डल्ला मारलाय.
दुपारच्या सुमारास सावी लोके या शेजा-यांकडे गेल्या असता अवघ्या वीस मिनिटांत चोरट्यांनी दरवाजा तोडून रोकड, दागिने आणि सुमारे एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय.
भरदिवसा होणा-या या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालाय.
सध्या शेतीच्या कामांना वेग आलाय. त्यामुळे गावातील माणसं शेतात असताना दोन दिवसापूर्वी साकेडी इथं सुमारे दोन लाखाची चोरी झाली होती.
या चोरीप्रकरणी अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. वाढच्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय.