बंद पुकारणाऱ्यांकडून नुकसान वसूल केलं जाणार?

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान झालेल्या नुकसानीचं महसूल विभाग सर्वेक्षण करत आहे. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 6, 2018, 09:53 AM IST
बंद पुकारणाऱ्यांकडून नुकसान वसूल केलं जाणार? title=

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान झालेल्या नुकसानीचं महसूल विभाग सर्वेक्षण करत आहे. 

बंदची हाक देणाऱ्या आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यासंदर्भात सरकार विचार करत असल्याचं, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट केलंय.

एसटीचं नुकसान, प्रवाशांच्या खिशावर ताण?

तर, एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागलंय... मात्र, हे नुकसान आंदोलनकर्त्यांकडून वसूल केलं जाणार नाही. आर्थिक नुकसान झालं असलं तरी आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत एसटीचं झालेलं नुकसान आंदोलनकर्त्यांकडून न घेता एसटी स्वत: सोसेल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याआधी म्हटलं होतं. अर्थातच हा ताण प्रवाशांनी का सोसावा? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. 

भिडे, एकबोटे, मेवाणी, खालिदवर कारवाई?

तसंच, जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदच्या पुण्यातील भाषणांचा सरकार सुक्ष्म अभ्यास करून कारवाईची दिशा स्पष्ट करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिलीय. तसंच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंच्या संदर्भात कायदा आपलं काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.