महाड एमआयडीसीत रसायन कंपनीला भीषण आग

रायगडमधल्या महाड एमआयडीसीत भीषण आग लागली. रोहन केमिकल कंपनीला ही आग लागली. 

Updated: May 24, 2018, 01:44 PM IST
महाड एमआयडीसीत रसायन कंपनीला भीषण आग title=

अलिबाग : रायगडमधल्या महाड एमआयडीसीत भीषण आग लागली. रोहन केमिकल कंपनीला ही आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महीनाभरातील आगीची ही दुसरी घटना असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्नीशमन दल दाखल झाले आहेत. रायगडच्या महाड एमआयडीसीतील रोहन केमिकल कंपनीत मोठी आग लागली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही .परंतु कंपनीच्या आवारात असलेले रसायनांनी भरलेले लोखंडी ड्रम आगीत पेटून उडताना दिसत आहे.

या रसायनाच्या धुरामुळे नागरिकांना डोळे झोंबण्याचा त्रास होत आहे. पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे . परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे ,  महिनाभरातील ही आगीची दुसरी घटना आहे .काही दिवसांपूर्वी याच एमआयडीसीतील प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत भीषण आग लागली होती त्यात संपूर्ण कंपनी जळून जवळपास 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते .  लागोपाठच्या या आगीच्या घटनांमुळे महाड एमआयडीसीच्या सेफ्टी ऑडिट चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x