खातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटपापूर्वीच दालनं आणि बंगल्याचं वाटप झाले आहे. अजित पवारांना सहाव्या माळ्यावरील शिंदे आणि फडणवीसांच्या सचिवांचं केबिन मिळाल्याचे समजते.

वनिता कांबळे | Updated: Jul 11, 2023, 08:35 PM IST
खातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांना  बंगले आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?  title=

Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीचा एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारसह सत्तेत सहभागी झाला आहे. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळ विस्तार होण्याआधीच राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यामुळेच मंत्रीमंडळ विस्तारासह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारां कोणती खाती मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.  खातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांचे  बंगल आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांंना उधाण आले आहे. 

कोणत्या मंत्र्यांना कोणते शासकीय बंगले?

छगन भुजबळ - सिद्धगड, (ब 6)
हसन मुश्रीफ - विशालगड (क 8) 
दिलीप वळसे पाटील - सुवर्ण गड (क 1) 
धनंजय मुंडे - प्रचितगड (क 6) 
अनिल भाईदास पाटील - सुरूची 8
संजय बनसोडे - सुरूची 18
धर्मराव बाबा आत्राम - सुरुची 3

कोणत्या मंत्र्यांना कोणते दालन?

छगन भुजबळ - मंत्रालय मुख्य इमारत, दुसरा मजला
हसन मुश्रीफ - मंत्रालय विस्तार इमारत, चौथा मजला
दिलीप वळसे पाटील - मंत्रालय मुख्य इमारत, तिसरा मजला
धनंजय मुंडे - मंत्रालय विस्तार इमारत, दुसरा मजला
धर्मराव बाबा आत्राम - मंत्रालय विस्तार इमारत, सहावा मजला
अनिल भाईदास पाटील - मंत्रालय मुख्य इमारतमजल,  चौथा मजला
संजय बनसोडे - मंत्रालय मुख्य इमारत,  तिसरा मजला
आदिती तटकरे - मंत्रालय मुख्य इमारत, पहिला मजला

अजित पवार यांच्या गटाला अर्थ, ग्रामविकास सारखी महत्वाची खाती मिळणार?

अजित पवार गटाला कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या गटाला अर्थ, ग्रामविकास, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक, कामगार, अन्न नागरीपुरवठा ही महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. मात्र खातेवाटपासाठी मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मुहूर्त लागेल अशी शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामुळे खातेवाटप रखडल्याची चर्चा

खातेवाटपाबाबत जोरबैठका सुरू असल्या तरी मंत्रिमंडळ विस्तारामुळे खातेवाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर तब्बल तासभर चर्चा झाली. काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला हवीयेत, त्या खात्यांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवारांसोबतच्या बैठकीपूर्वी फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर गेले होते. मात्र अजित पवार भेटीला येणार असल्यामुळे फडणवीसही सागर बंगल्यावर आले. शिंदे गटानं मंत्रिमंडळ विस्ताराचा आग्रह धरल्यामुळे खातेवाटप रखडल्याची चर्चा आहे. दरम्यान लवकरच खातेवाटप आणि विस्तार होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली आहे.