Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी मतदान झाले असून अवघ्या काही तासांतच निकाल जाहीर होणार आहे, निकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका बसला आहे. 16 डिसेंबरला बारामतीच्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश अजित पवारांना देण्यात आले आहेत. 2014 या वर्षातील एका प्रकरणात अजित पवारांना कोर्टाने समन्स बजावले आहे.
निकालाआधीच अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. अजित पवारांना कोर्टात हजर राहण्याचं समन्स पाठवण्यात आले आहे. 2014च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावच पाणी बंद करू असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे अजित पवारांना कोर्टाने समन्स बजावल्याची माहिती याचिकाकर्ता सुरेश खोपडे यांनी दिली. अजित पवार यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. बारामतीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात हजर राहण्याबाबत अजित पवारांना समन्स जारी करण्यात आले आहे.
मुंबई सेशन कोर्टाकडून बच्चू कडूंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 वर्षांपूर्वी मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव दर्जाच्या अधिका-यांना झालेल्या मराहाण प्रकरणी बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई सेशन कोर्टानं कडूंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंगाचे वेगवेगळे गुन्हे दाखल केलंत. मतदानाच्या दिवशी कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये तुफान रडा झाला होता. धमकी देणे, हुज्जत घालणे असे 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.