Maharashtra Assembly Election 2024 BJP In Big Trouble: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. असं असतानाच महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागणार हे उघड झालं आहे. विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणारा पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्येही थेट मुंबईत मोठी बंडखोरी झाली असून पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. अगदी सोमवारी रात्री मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपाच्या या वरिष्ठ नेत्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही या नेत्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळेच भाजपाला या हक्काच्या मतदारसंघामध्ये फटका बसू शकतो.
समोर आलेल्या माहितीनुसार भाजपाविरोधात बंड करणाऱ्या माजी खासदाराचं नाव आहे, गोपाळ शेट्टी! भाजपाने गोपाळ शेट्टींना उमेदवारी अर्ज नाकारल्याने बोरिवलीतून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाने मुंबई उपाध्यक्ष संजय उपाध्याय यांना बोरीवलीमधून उमेदवारी दिल्याने शेट्टी नाराज झाले आहेत. आयात उमेदवारांना संधी दिले जाते अशी शेट्टी यांचा आक्षेप आहे. संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक नेते नाराज असून नाराज स्थानिक नेत्यांमध्ये गोपाळ शेट्टींबरोबरच शिवानंद शेट्टी, गणेश खणकर, प्रविण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांचाही समावएश आहे. यापूर्वीही या मतदारसंघातून विनोद तावडे, सुनिल राणे हे उमेदवार देण्यात आले होते. आयात उमेदवारांच्या मुद्द्याला कंटाळून आता स्थानिकांनी पक्षाविरुद्ध बंड केलं आहे. रस्त्यावर उतरून गोपाळ शेट्टी समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं या मतदारसंघात पाहायला मिळालं.
नाराज गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्यासाठी सोमवारी रात्री मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार गोपाळ शेट्टी यांच्या भेट घेतली. मात्र त्यांना गोपाळ शेट्टींची समजूत घालण्यात अपयश आलं. त्यानंतर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप आमदार योगेश सागर गोपाळ शेट्टी यांच्या घरी गेले होते. मात्र त्यांनाही यात यश आलं नाही. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपाने शिंदेंच्या पक्षासोबत केलेल्या तडजोडीमुळे त्यांना मुंबादेवीमध्येही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. येथे अतुल शाह यांनी बंडखोरी केली आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाला आहे. त्यामुळेच इथे तडजोड करुन इथून शिंदेंनी भाजपातून पक्ष प्रवेश केलेल्या महिला नेत्या शायना एनसी यांना उमेदवारी दिल्याने अतुल शाह यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे. घाटकोपरमध्येही पराग शाह यांना तिकीट दिल्याने प्रकाश मेहता यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.