Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा...   

सायली पाटील | Updated: Oct 25, 2024, 10:41 AM IST
Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?
Maharashtra Assembly Election 2024 krishnaraj dhanajay mahadik might join eknath shindes shivsena for kolhapur north vidhansabha constituency

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातल राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या पक्षफोडीचं राजकारण वेग धरत असतानाच उमेदवारीसाठी नेतेमंडळी आणि काही मोठे चेहरेच प्रस्थापितांचे पक्ष सोडत जिथं उमेदवारीची संधी आहे अशा पक्षांची साथ घेताना दिसत आहेत. किंबहुना अनेकांनी नवी सुरुवात करत निवडणुकीआधी पक्षप्रवेशही केले आहेत. तिथं कोकणात निलेश राणे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केला असतानाच इथं महायुतीत आणखी एका पक्षांतराच्या चर्चेनं जोर धरला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सूत्रांच्या माहितीनुसार महायुती मध्ये पुन्हा कोकण पॅटर्न लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघासाठी जोरदार रस्सी खेच सुरु असल्यामुळं (BJP) भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. महाडिक यांनी आपले पुत्र कृष्णराज महाडिकला उमेदवारी मिळवून देण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

हेसुद्धा वाचा : अजित पवारांची दुसरी यादी: RR पाटलांच्या लेकाविरुद्ध दिला उमेदवार; झिशान सिद्दीकी, सना मलिकला संधी

 

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा (Kolhapur North) शिवसेनेचा (Shivsena)असल्यामुळं आता ती जागा मुलगा कृष्णराज महाडिक याला मिळावी म्हणून खासदार धनंजय महाडिकांनी (MP Dhananjay Mahadik) चांगलीच तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर कृष्णराज महाडिक हातात शिवधनुष्य घेण्याची शक्यता आहे. अर्थात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत कृष्णराज यांचा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कृष्णराजच्या प्रवेशास ग्रीन सिग्नल दिल्यामुळं आता शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत या नावाचा समावेश होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  

कोण आहे कृष्णराज महाडिक? 

कृष्णराज महाडिक हा खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा. कोल्हापुरात कृष्णराज बराच प्रसिद्ध असून, तो स्थानिकांच्या प्रश्नांपासून युवा वर्गासाठी अनेक उपक्रमांचं आयोजन करताना दिसतो. युट्यूबच्या माध्यातूनही कृष्णराज व्लॉगिंग करत बराच प्रकाशझोतात आला आहे. इथं तो Daily Vlogs सोबतच जनसेवाहितार्थ करत असलेल्या कामांचे व्हिडीओ, राजकीय भेटीगाठी यासंदर्भातील माहिती देताना दिसतो. कृष्णराजची आणखी एक ओळख म्हणजे, त्यानं ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. 7 वर्षांपूर्वी तब्बल 19 वर्षांनंतर एखाद्या भारतीयानं ही किमया केली होती. 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More