Maharashtra Congress: तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये यश मिळवून दिलेल्या योजनांचा आधार घेत महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी प्लान आखला आहे. आज 6 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुंबई इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत काँग्रेस आपल्या 5 गँरची जाहीर करणार आहेत. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेदेखील सभेत राज्यातील जनतेला करणार संबोधित करणार आहेत.
काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपयांची कर्जमाफी आणि 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केला होता. कर्नाटकमध्ये गृह लक्ष्मी योजना आणली होती. महाराष्ट्रातदेखील तशाच पाच गँरटी राबवण्याची काँग्रेसची योजना आहे. यात 500 रुपयांपर्यंत गॅस सिलेंडर, महिलांसाठी मोफत ST प्रवास, 50 हजार महिलांसाठी सरकारी नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफी योजना, मोफत आरोग्य विमा 10 लाखापर्यंत करण्यात येणार, या पाच गॅरंटी जाहीर करण्यात येण्याची शक्यता.
आज संध्याकाळी मुंबईतील BKC मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (SP) शरद पवार, शिवसेना (UBT) उद्धव ठाकरे आणि इतर महत्त्वाचे नेते या सभेत राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या राज्यभरात एकूण 51 सभा पार पडणार आहेत. उद्यापासून नांदेड जिल्ह्यातून सभेला सुरुवात होणार आहे. मुंबईत कमी कमी सभा तर विदर्भात सर्वाधिक सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत 51 सभांचं आयोजन. आगामी दिवसात सभा वाढण्याची शक्यता.
कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडाची तलवार म्यान करून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय शहर काँग्रेसने घेतला आहे. तसा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसलाही पाठविण्यात आला आहे. आबा बागुल, कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.