Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ( राष्ट्रवादी SP) 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह भाजपमधून आलेल्या बड्या नेत्याला उमेदवारी मिळली आहे. बारामतीत युगेंद्र पवार अजित पवार यांच्याविरोधात लढणार आहेत. महाविकास आघाडीची ही दुसरी यादी आहे. महाविकास आघाडीचा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नसल्याचं जागावाटपाच्या सूत्रावरून स्पष्ट होतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 85, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 85 जागा, तर काँग्रेसला 85 जागा असा हा फॉर्म्युला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपली 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तिन्ही पक्षांना 270 जागा मिळणार आहेत. तर मित्रपक्षांना 18 जागांवर उमेदवार देता येणार आहेत.
आज राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीसह अन्य उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत.. यामध्ये जयंतराव पाटील यांनी इस्लामपूरमधून, मंत्री छगन भुजबळांनी येवल्यातून तर जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा कळवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय... त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी, गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण, संजय राठोडांनी दिग्रस.. विजयकुमार गावित यांनी नंदुरबारमधून तर मनसेच्या राजू पाटील यांनी कल्याण ग्रामिण मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेय..
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.