महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसे

Rahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी गॅरंटी जाहीर केली आहे.  

वनिता कांबळे | Updated: Nov 6, 2024, 08:05 PM IST
महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसे title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. महाविकास आघाडीने मुंबईच्या बीकेसीमध्ये एकत्रित सभा घेतली. शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरेंची एकत्र सभा आहे.   विधानसभा निवडणुकीसाठी मविआची पहिलीच जाहीर सभा आहे. या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी  महाराष्ट्रासाठी  पहिली मोठी गॅरंटी जाहीर केली. या सभेट राहुल गांधी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 

महाविकासआघाडीचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासह महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार आहे असे राहुल गांधी यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हाणाले. 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत केली जाणार आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x