Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी विधानसभेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. (Maharashtra Budget session) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर अखेर फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत राज्यातील शेतकरी, मासेमार आणि महिलांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महिलांसाटी नव्या आर्थिक वर्षात अनेक नव्या गोष्टी वाढून ठेवल्याचं त्यांनी स्पष्ट करत लक्षवेधी घोषणा केल्या.
महिलांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा खालीलप्रमाणे...
- मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये दिले जाणार, पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळणार
- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये, इयतात पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये, इयत्ता अकरावीत 8000 रुपये तर, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये दिले जाणार
- 20 हजार अंगणवाडी सेविका पदे भरली जाणार
- आशा सेविकांच्या मानधनात वाढ करणार
- राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर, मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करणार
- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचाराची व्यवस्था करणार
- नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना
- शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
- अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
- या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा मिळणार. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार.