Maharashtra Budget Session News in Marathi : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (26 फेब्रुवारी) सुरू होत आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सकाळी 11 वाजता तर विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू होईल. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेराव घालण्याची संधी असेल. तसेच शेतकरी, मराठासह अन्य समाजासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या अधिवेशनात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्नात असून, या पार्श्वभूमीवर मराठा कुणबी समाजाच्या सगेसोयरे व्याख्येच्या अधिसूचनेविषयी सरकार काय निर्णय घेते? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. तसेच राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीक पकडायला विरोधक आक्रमक झालेत. मराठा आरक्षण, पोलीस ठाण्यात गोळीबार, लोकप्रतिनिधीची हत्या, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, पुण्यात सापडलेले ड्रग्ज, कांदा निर्यात बंदी, निवासी डॉक्टरांचा संप, यासह विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला वेढण्याच्या तयारीत आहेत.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मनोज जरांगे यांनी आरोप केले होते. एकीकडे सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं असताना दुसरीकडे मनोज जरांगे मात्र ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षणासाठी ठाम असल्याचे दिसत आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू न देण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
पूरवणी मागण्यांवर चर्चा मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच दुपारी 2 वाजता 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. अंतरिम अर्थसंकल्प 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यांच्या आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते, कर्जाची परतफेड, व्याज आणि लोकसभा निवडणुकीसाठी झालेला खर्च यांचा समावेश आहे.
अधिवेशनाचे कामकाज विधिमंडळ सचिवालय ठरवते. पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण, त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दस आभार अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार. 2023-24 साठी पूरवणी मागन्या सादर केल्या जातील. त्यानंतर शासकीय कामकाज सुरू होईल. भाजप आमदार राजेंद्र पाटणी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्तावानंतर कामकाज झाले. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पुरवणी यांच्या मागण्यांवर चर्चा करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर 2024-25 चा अंतिम अर्थसंकल्प दुपारी 2 वाजता सादर केला जाईल.