Maharashtra Cabinet Ministers Full List: असं असेल फडणवीस 3.0 सरकारचं मंत्रीमंडळ! पाहा 42 मंत्री कोण

Maharashtra Cabinet Ministers Full List: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात कोणकोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता कायम होती. अखेर आता मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी समोर आली आहे. पाहूयात कोण कोण आहे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये...

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2024, 01:35 PM IST
Maharashtra Cabinet Ministers Full List: असं असेल फडणवीस 3.0 सरकारचं मंत्रीमंडळ! पाहा 42 मंत्री कोण title=
कोणाकोणाची लगाली वर्णी संपूर्ण यादी पाहाच

Maharashtra Cabinet Ministers Full List: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महायुतीमधील तीन प्रमुख नेत्यांनी 12 दिवसानंतर शपथ घेतली. 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर 5 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर त्याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीसांच्या नेतृत्वाखालील या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी आणि लॉबिंग सुरु असल्याच्या बातम्याही समोर आल्या. अखेर आज म्हणजेच 15 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडत आहे. 

20-12-10 फॉर्म्युला

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान पार पडणार असून त्यापूर्वी एकूण 42 मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते शपथ घेणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत. म्हणजेच फडणवीसांच्या मंत्रिमंडळ कसं असणार आहे याचं चित्र स्पष्ट झालं असलं तरी कोणावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र मंत्री म्हणून कोणकोण शपथ घेणार आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे. भाजपाचे 20, शिवसेनेचे 12 आणि अजित पवारांचे 10 आमदार मंत्री असतील असं निश्चित झालं आहे. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. त्यामुळेच या तिन्ही पक्षांनी 42 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ निश्चित केलं आहे. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंढळात कोणकोण असेल ते पाहूयात...

भाजपाचे 20 मंत्री कोणते?

1) देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

2) चंद्रशेखर बावनकुळे

3) नितेश राणे

4) शिवेंद्रराजे भोसले

5) चंद्रकांत पाटील

6) गिरीश महाजन

7) पंकजा मुंडे

8) जयकुमार रावल

9) राधाकृष्ष विखे-पाटील

10) गणेश नाईक

11) पंकज भोयर

12) मेघना बोर्डिकर

13) माधुरी मिसाळ

14) अतुल सावे

15) आकाश फुंडकर

16) अशोक उईके

17) आशिष शेलार

18) मंगलप्रभात लोढा

19) जयकुमार गोरे

20) संजय सावकारे

शिवसेनेचे 12 मंत्री कोणते?

1) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)

2) उदय सामंत

3) प्रताप सरनाईक

4) भरत गोगावले

5) शंभूराज देसाई

6) आशिष जैयस्वाल

7) गुलाबराव पाटील

8) संजय राठोड

9) संजय शिरसाट

10) दादा भुसे

11) प्रकाश आबिटकर

12) योगेश कदम

राष्ट्रवादीचे 10 मंत्री कोणते?

1) अजित पवार (उपमुख्यमंत्री)

2) आदिती तटकरे

3) नरहरी झिरवाळ

4) दत्ता भरणे

5) हसन मुश्रीफ

6) बाबासाहेब पाटील

7) मकरंद पाटील

8) इंद्रनील नाईक

9) धनंजय मुंडे (नाव शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित नाही.)

10) छगन भुजबळ (नाव शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित नाही.)