रुग्ण बरा होण्याचा दर सातत्याने ५५ टक्क्यांवर, सर्वाधिक रुग्ण ठाणे आणि पुण्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश असले तरी ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत.  

Updated: Jul 16, 2020, 07:33 AM IST
रुग्ण बरा होण्याचा दर सातत्याने ५५ टक्क्यांवर, सर्वाधिक रुग्ण ठाणे आणि पुण्यात title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश असले तरी ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याचवेळी मुंबईतील आकडा कमी होताना दिसत आहे. असे असले तरी रायगड, पालघर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत रुग्णांचा आकडा वाढताना दिसत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२  हजार ६१३  झाली आहे. 

दरम्यान, राज्यात बुधावारी ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल कोरोनाच्या  ७९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ११ हजार ८०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात  काल २३३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९६ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २३३ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-५, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-१५, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी-निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१,वसई-विरार मनपा-५, रायगड-४, पनवेल मनपा-१, नाशिक-४, नाशिक मनपा-९, धुळे-१, धुळे मनपा-२, जळगाव-५, जळगाव मनपा-९, पुणे-६, पुणे मनपा-३१, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-१, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-४, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेले जिल्हे :

१. ठाणे : बाधित रुग्ण- (६७,३६०), बरे झालेले रुग्ण- (३०,८२०), मृत्यू- (१८१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,७२१)

२. पुणे : बाधित रुग्ण- (४४,२०२), बरे झालेले रुग्ण- (१७,४९२), मृत्यू- (१२००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,५१०)

३. मुंबई : बाधित रुग्ण- (९६,४७४), बरे झालेले रुग्ण- (६७,८३०), मृत्यू- (५४६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,८८८)

४. रायगड : बाधित रुग्ण- (९६०४), बरे झालेले रुग्ण- (४२३८), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९२)

५. पालघर: बाधित रुग्ण- (१०,४६२), बरे झालेले रुग्ण- (५३३८), मृत्यू- (२०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१६)

६. नाशिक : बाधित रुग्ण- (७९३२), बरे झालेले रुग्ण- (४५७५), मृत्यू- (३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०३८)

७. जळगाव : बाधित रुग्ण- (६५७६), बरे झालेले रुग्ण- (३७६८), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४३३)