महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, कोकणसाठी 3 हजार 200 कोटींचे पॅकेज

Konkan News : राज्यात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray's government) कोकणसाठी (Konkan) महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे.  

Updated: Sep 16, 2021, 09:03 AM IST
महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, कोकणसाठी 3 हजार 200 कोटींचे पॅकेज title=
संग्रहित छाया

मुंबई : Konkan News : राज्यात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray's government) कोकणसाठी (Konkan) महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा ( Disaster Management Plan) तयार करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. दरडी कोसळणे, भूस्खलनाच्या जागांच्या शोधासाठी तज्ज्ञांची समिती स्थानप कऱण्यात येणार आहे. तसेच कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम  राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  

तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 हजार 200 कोटी पैकी 2 हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित 1200 कोटी रुपये पुढील 4 वर्षांत (2022-25) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी तसेच सौम्यीकरण निधीचा योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी 4 वर्षासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट (Project Monitoring Unit) व सल्लागारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी  होणारा खर्च क्षमता बांधणी व पूर्वतयारीसाठी उपलब्ध निधीच्या 7 टक्के मर्यादेत व सौम्यीरकणासाठी उपलब्ध निधीच्या 3 टक्के मर्यादेत राज्य योजनेमधून विभागास मंजूर होणाऱ्या तरतूदीतून खर्च करण्यास मान्यताही देण्यात आली.