मीरा भाईंदर : भाजपाच्या नरेंद्र मेहतांना धक्का, बंडखोर गीता जैन आघाडीवर

काय आहे मीरा-भाईंदरकरांचा कौल 

Updated: Oct 24, 2019, 11:41 AM IST
मीरा भाईंदर : भाजपाच्या नरेंद्र मेहतांना धक्का, बंडखोर गीता जैन आघाडीवर

 मुंबई : पक्षादेशाविरोधात जात अपक्ष बंडखोर गीता जैन मीरा-भाईंदर विधानसभा निवडणूकीत आघाडीवर आहेत. गीता जैन यांनी भारतीय जनता पक्षात बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिल्या. गीता जैन यांनी मतमोजणीच्या दिवशी अगदी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत. भाजपच्या विद्यमान नगरसेविका आणि माजी महापौर गीता जैन यांना भाजपकडून 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली होती.

भाजपकडून नरेंद्र मेहता यांनी उमेदवारी देण्यात आली. पण मोजणीच्या सुरूवातीपासूनच नरेंद्र मेहता पिछाडीवर होते. गीता जैन या १४५ विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या, मात्र भाईंदरचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना भाजपने उमेदवारी दिल्याने त्यांनी भाजप पक्षाशी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला मतदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. 

नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली होती. एवढंच नव्हे तर भाजपाचे नगरसेवक मॉरीश रोड्रिक्स यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला होता. तसेच रोड्रिक्स यांनी बंडखोर अपक्ष नेता गीता जैन यांना समर्थन दिलं होतं. याचा फायदा गीता जैन यांना झाल्याचं दिसत आहे. 

तसेच भाजपाच्या महिला अध्यक्षा रिया म्हात्रे यांनी देखील मेहता यांच्यावर मनमानीचा आरोप लावला होता. याचा फटका देखील मेहता यांना पडल्याचं दिसत आहे. 500 कार्यकर्त्यांसोबत गीता जैन यांनी पक्ष सो़डून बंडखोरी केली होती. मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. 95 सदस्यीय महानगरपालिकेत भाजपचे 61, शिवसेनेचे 22 आणि काँग्रेसचे 12 असे नगरसेवक आहेत. महायुतीचे 20हून अधिक नगरसेवक ओवला-माजीवाडा विधानसभा क्षेत्रात येतात.