महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव जेथे ४५ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांचं १०० टक्के लसीकरण

सुरुवातीच्या काळात लसीबद्दल अनेक अफवा उडाल्या होत्या परंतु येथील ग्रामस्थांची जनजागृती आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह प्रशासनाने पसरवलेल्या जनजागृतीचा ग्रामस्थांवर परिणाम झाला

Updated: May 19, 2021, 06:23 PM IST
महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव जेथे ४५ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांचं १०० टक्के लसीकरण title=

अमरावती : महाराष्ट्र हा देशातील सर्वात जास्त कोरोना संक्रमित असलेले राज्य आहे. त्यामुळे  महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेची गती ही वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु लसांची कमतरता असल्याने या मोहिमेला उशीर होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अमरावतीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळाले आहे. अमरावतीतील मेळघाटमधील चिंचखेड गाव आता एक असे गाव बनले आहे, जिथे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

वास्तविक, हे गाव आदिवासी भागात आहे. सुरुवातीच्या काळात लसीबद्दल अनेक अफवा उडाल्या होत्या परंतु येथील ग्रामस्थांची जनजागृती आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह प्रशासनाने पसरवलेल्या जनजागृतीचा ग्रामस्थांवर परिणाम झाला आणि ग्रामस्थांनी कोणतीही भीती न बाळगता ही लस घेण्यास सुरू केले. अफवांमुळे लोक ग्रामीण भागात लसीकरण टाळत असताना, इथल्या लोकांनी खबरदारी घेतली आणि आपले लसीकरण पूर्ण केले.

या खेड्यातील लोकसंख्या 604 आहे, त्यापैकी 136 लोकं 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांनी देशासमोर एक नवीन उदाहरण मांडले आहे ज्यामुळे येथील गावकरी खूप आनंदीत आहेत आणि आता आजूबाजूचे गावकरीही त्यांना पाहून प्रेरणा घेत आहेत.

देशातील लसींच्या तुटवड्यामुळे, गावात 18 ते 45 वर्षे लोकांचे लसीकरण थांबविले गेले आहे. लसीकरण सुरू होताच गावकरी त्यात भाग घेतील आणि 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकं उत्साहाने लसीकरण करतील.  एकंदरीत चिंचखेड गाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे.