Shiv Sena Crisis: शिवसेना शेवटच्या क्षणी 'बाजी' पलटवू शकते?, BJP आणि एकनाथ शिंदे यांचा तयार Plan B!

Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. (Shiv Sena Crisis) मात्र, शिवसेनेने शेवटच्या क्षणी 'बाजी' लावू शकते अशी शिंदे आणि भाजपला भीती आहे.

Updated: Jun 23, 2022, 03:04 PM IST
Shiv Sena Crisis:  शिवसेना शेवटच्या क्षणी 'बाजी' पलटवू शकते?, BJP आणि एकनाथ शिंदे यांचा तयार Plan B! title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. (Shiv Sena Crisis) मात्र, शिवसेनेने शेवटच्या क्षणी 'बाजी' लावली तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा 'प्लॅन बी' तयार आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाठीमागून सूत्र हलवित असल्याची माहिती आहे.

 महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारे शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आज 46 आमदारांसह उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे पत्र देऊ शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात  मोठी उलथापालथ होऊ शकते. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्व आवाहनांना न जुमानता, अनेक आमदारांनी बंडखोरी करत गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या गोठात गेले. आपल्यासोबत एकूण 46 आमदार असल्याचा शिंदेंचा दावा आहे. दरम्यान, या संपूर्ण खेळामागे भाजपचा हात असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा प्लॅन बीही तयार आहे.  

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आधीच कोरोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. अशा स्थितीत राज्यपालपदाची जबाबदारी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे आपल्या सर्व बंडखोर आमदारांसह मुंबईत येण्याऐवजी थेट गोव्यात जाऊन सर्व आमदारांसह गोव्याच्या राज्यपालांसमोर परेड करु शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या बंडखोर आमदारांना फ्लोअर टेस्टसाठी मुंबईत आणले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भीतीने यापैकी काही आमदार फुटण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजप आणि एकनाथ शिंदे यांना आहे. याचे कारण कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलिसांची जबाबदारी अजूनही त्यांच्याच हातात आहे. 

सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या हालचाली

शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे गटाचे 50 आमदार आणि भाजप यांची युती होऊन राज्यात नवे सत्तासमीकरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडूनही एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. तसेच 12 मंत्री होऊ शकतात, अशी शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 144 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक  50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळुन 164 आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करुन राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरु झाल्यात. आहेत.