Maharashtra Political News : शिंदे गटाने (Shinde group) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray group) पक्षाला मोठा धक्का दिला आहे. (Shiv Sena Crisis) शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटाला जोरदार धक्का देण्यात आला आहे. (Latest Political News in Marathi) शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे. परभणी जिल्ह्यातील आणि नाशिकमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी डेरेदाखल होत आहे. (Maharashtra News in Marathi)
परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम इथले 30 नगरसेवर शिंदे गटात दाखल झाले आहेत. ठाकरे गटासह राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात नगरसेवकांनी प्रवेश केला.
दरम्यान, नाशिकमध्येही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकची जबाबदारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आहे. त्यांच्या दौऱ्याच्या आधीच नाशिकमधील 58 शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी करणार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात मुंबईत ते पक्ष प्रवेश करणार आहेत.
खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर जाण्याआधी ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेय. यापूर्वी संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी बाळसाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आताही त्यांच्या दौऱ्याच्या आधी पक्षप्रवेश होत असल्याने राऊत यांच्यावर कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, औरंगाबद येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बंडखोरांना बुटाने मारायला हवे, असे ते म्हणाले. शिंदे गटाच्या आमदारांबाबत बोलताना अंबादास दानवे यांची जीभ घसरली आहे. बुटाने मारण्याची यांची लायकी आहे आणि राहणार आहे. आमदार वाणी साहेब असते तर यांना बुटाने मारले असते. वैजापूर येथील सभेत बोलताना त्यांची जीभ घसरली. शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांवरुन बोलताना बुटाने मारण्याची भाषा दानवे वापरली.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठी गळती लागलीय. आज 58 पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश केला. त्याआधी 22 डिसेंबरला राऊतांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरींनी शिंदे गटात प्रवेश केला. तर त्याआधी 12 डिसेंबरला नाशिक महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्यासह 12 नगरसेवकही शिंदेंच्या गोटात दाखल झाले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे ही गळती कशी रोखणार? त्यांची काय रणनीती असणार? ते पहावं लागेल. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे.