CORONA : राज्यात आज 48,621 नव्या रुग्णांची वाढ, 567 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. 

Updated: May 3, 2021, 09:39 PM IST
CORONA : राज्यात आज 48,621 नव्या रुग्णांची वाढ, 567 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे 48,621 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 59,500 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात 567 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.राज्यात  6,56,870 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 70,851 रूग्णांचा कोरोमामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 2,662 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 5,746  जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 13,408 रूग्णांचा कोरोमामुळे मृत्यू झाला आहे. . मुंबईत अजून एकूण 54,143 सक्रिय रुग्ण आहेत. 

कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 498 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका दिवसात 1520 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज.उपचार घेत असलेले रुग्ण 9931 एवढी असून गेल्या 24 तासांत कोरोना बाधित 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आज 802 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 124646 आहे. जिल्हात आज 19 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर  सध्या 10 हजार 55 रुग्ण उपचार घेत आहेत.