BIG Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला! मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढ

 एसटी कर्मचाऱ्यांनी  अखेर संप मागे घेतला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 4, 2024, 09:11 PM IST
BIG Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला! मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढ title=

Maharashtra ST Employees Strike : आपल्या विविध मागण्यांसाठी  एसटी कर्मचाऱ्यांनी  संपाचं हत्यार उपसलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात, एसटी कर्मचारी संघटना कृती समितीसह बैठक पार पडली. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणा-या प्रवाशांचे अतोनात हाल होतायत. तसंच काही गावांमध्ये एकही एसटी डेपोतून बाहेर निघत नसल्यानं गावकरी, विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली होती. संप मागे घेतल्याने राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

दरम्यान,  एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. संपाच्या दुस-या दिवशी एसटीचा सुमारे 22 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. तर राज्यभरातील 251 पैकी 94 एसटी आगार पूर्णपणे बंद होते. त्याचवेळी दिवसभरात सुमारे 70 टक्के वाहतूक बंद होती. विशेष म्हणजे काल संपाच्या पहिल्या दिवशी अंदाजे 14 कोटींचं एसटीचं नुकसान झालंय. एसटीच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीनं संप पुकारलाय. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x