Cyclone Biporjoy : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असणाऱ्या अनेकांच्याच नजरा आता समुद्रात घोंगावणाऱ्या चक्रिवादळानं वळवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात आलेल्या मोका चक्रिवादगळामागोमाग अरबी समुद्रातही वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन त्याचं रुपांतर चक्रिवादळात होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार मंगळवारीच अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागावर घोंगावणाऱ्या वाऱ्यांचं रुपांतर चक्रिवादळामध्ये झालं असून 'बिपरजॉय' असं या वादळाचा नाव आहे. आयएमडीनं गिलेल्या इशाऱ्यानुसार या वादळामुळं येत्या 24 तासांमध्ये कोकणचा किनारपट्टी भाग, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. तर, मुंबई, ठाणे, पालघरमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार तीव्र दाबाचा पट्टा 4 किमी प्रतीतास इतक्या वेगानं उत्तरेला पुढे सरकत आहे. सध्याच्या घडीला हे वादळ मुंबईपासून 900 किलोमीटरवर अरबी समुद्रात सक्रिय असल्याचं म्हटलं जात असून, पुढील सहा तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं वादळाच्या पार्श्वभूमीवर लहान नौका घेऊन मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छिमार बांधवाना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Deep Depression intensified into Cyclonic Storm BIPARJOY over the East-central Arabian Sea at 17.30 hrs. To move nearly northwards and intensify into a severe cyclonic storm during next 24 hours: IMD pic.twitter.com/l05ADJlVlg
— ANI (@ANI) June 6, 2023
National Bulletin No. 06:
Cyclonic Storm Biparjoy ovr EC & adj se Arabian Sea at 2330hrs of 6 Jun,is abt 900km wsw of Goa,1020km sw of Mumbai
Likly to move nearly N & intensify in SCS ovr EC Arabian Sea nxt 6 hr & further in Very SCS over EC Arabian Sea in subsequent 24 hrs
IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2023
पाहा वादळाचं लाईव्ह लोकेशन....
चक्रिवादळाच्या एकंदर वातावरणामध्ये कर्नाटकचा किनारपट्टी भाग, लक्षद्वीप, मालदीवसह कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये समुद्र 10 जूनपर्यंत उसळलेला असेल. याचा परिणाम मान्सूनवर होणार असून राज्यात आणि केरळातही मान्सून लांबणीवर पडला आहे. दरम्यान वादळाच्या काळात होणारा पाऊस हा मान्सून नाही ही बाब लक्षात घ्यावी असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
तिथे केरळातच मान्सून सक्रिय झाला नसल्यामुळं इथं महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. केरळातील मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त हुकला असून, 10 जूनपर्यंत राज्यात तो दाखल होण्याचा अंदाजही आता निरर्थक ठरत आहे. ज्यामुळं आता राज्यात 13 ते 15 जून दरम्य़ान पाऊस सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रावात स्थितीमुळे मान्सूनचा वेग मंदावल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.