Maharashtra Weather Updates : राज्यात थंडीची चाहुल लागली असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे असून थंडीची लाट (Maharashtra Cold Wave) आणखी तीव्र होईल, अशी शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मुंबई, पुण्यात पारा घसरला आहे. काल पुणे आणि कोकणातील दापोलीत सर्वात कमी तापमानाची (Maharashtra Temperature) नोंद झाली आहे. येथे 10 अशांच्या खाली पारा गेल्याने थंडीची लाट आली आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. निफाडमध्ये 6.3 तर परभणीत पारा 7 अंश सेल्सिअसवर खाली आला आहे.
राज्यात कोकण, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Cold Wave) परिणामस्वरुप मुंबईतही हुडहुडी जाणवणार आहे. (Mumbai Temprature) 14 जानेवारीपर्यंत राज्यात थंडीत वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे आहेत. मुंबई, पुण्यात पारा घसरलेला पाहायला मिळत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या हुडहुडीतून बचावासाठी चिमुकल्यांसह वृद्ध नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. मागच्या आठ दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरुर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. अशात अचानक वातावरण बदल झाल्याने थंडीने हुडहुडी भरली असून तापमानाचा पारा 10.3 अंश सेल्सियसपर्यंत खाली आला आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात बुधवारपासून अनेक ठिकाणी तापमानात आणखी 3 ते 4 अंशाने घट होणार आहे. तर कोल्हापूर, सातारा, पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील काही जिल्ह्यात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री काही प्रमाणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यात 15 अशांच्या खाली पारा गेल्याने थंडीची लाट आली आहे.
उत्तर भारतातील थंडीची लाट आली आहे. तसेच दाट धुक्यामुळे राज्यातही थंडीची लाट आली आहे. राज्यात मागच्या चार दिवसांपासून पारा घसरत चालल्यामुळे बहुतेक जिल्ह्यात जोरदार थंडी सुरु झाली आहे. उत्तर भारतात आलेल्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रात सुरुवातीला विदर्भातील जिल्ह्यांवर झाला. यानंतर राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यात 15 अशांच्या खाली पारा गेल्याने थंडीची लाट आली आहे.