Maharashtra Weather Update : मान्सूनची (monsoon) वाटचाल सकारात्मक वेगानं सुरु असतानाच आता महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यामध्ये काही भागांत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात, कमालीचे चढ- उतार पाहायला मिळाले. तर, काही भागांमध्ये हवेतील आर्द्रतेमुळं उकाडा अपेक्षेहून जास्त असल्याचं भासत होतं. त्यातच कोल्हापुरात पावसानं धुमाकूळ घातलं.
बुधवारी झालेल्या मुसळधार कोल्हापुराला (Kolhapur) झोडपून काढलं. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाल्याचंही पाहायला मिळालं. श्रीक्षेत्र आदमापुरात मंदिराबाहेर असणाऱ्या छोट्या व्यापारांचं या पावसामुळं मोठं नुकसान झालं. मंडप आणि घरांवरील पत्रे उडाल्यामुळं अनेकांचीच तारांबळ उडाली.
सध्याच्या घडीला राज्यातील हवामानाची एकंदर परिस्थिती पाहता पुढील दोन ते तीन दिवसही राज्यात अशाच पद्धतीचं हवामान असेल असं सांगण्यात येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 जून रोजी कोकणासह गोव्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. तर, 2 ते 4 जूनदरम्यान विदर्भाच्या काही भागांमध्येही पाऊस हजेरी लावेल. यावेळी पासवाची तीव्रता जास्त नसली तरीही ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट यामुळं मान्सूनच्या येण्याची तयारीच निसर्ग करतोय असं भासेल. थोडक्यात या वीकेंडला तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर पावसाच्या येण्यानं हा वीकेंड आनंदात जाईल असं म्हणायला हरकत नाही.
सध्याच्या घडीला विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. जो मराठवाडा, कर्नाटकातून पुढे जात असून, त्यामुळं या भागांमध्ये हवामानबदलांनी नोंद केली जाऊ शकते. तिथे देश पातळीवर सांगावं तर, सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावाताचे परिणाम पुढील 2 दिवस कायम असणार आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात येत आहे. पावसाचं प्रमाण कमी असलं तरीही वातावरण ढगाळ आणि बऱ्याच अंशी दमट असेल असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं.
latest satellite obs at 7 pm today
convective activities over ghat areas of Pune Satara and further down on west coast. pic.twitter.com/GZHFtUYnGK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 31, 2023
सध्या बऱ्याच राज्यांमध्ये पर्यटनाचा ओघ वाढला असून, अनेक पर्यटक (Himachal Pradesh, Jammu Kashmir, Uttarakhand) हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरच्या दिशेनं रवाना होताना दिसत आहेत. तुम्हीही उत्तराखंडच्या दिशेनं जाण्याच्या बेतात असाल तर तिथं सुरु असणाऱ्या पावसाचा अंदाज एकदा घ्याच. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळं सध्या उत्तराखंडमधील नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. या भागात 2 जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं प्रशासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील 2 दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.