मुंबई : देशभरात कोरोनाचा (Corona) कहर वाढत असताना. महाराष्ट्रासाठी (Maharashtra News) चिंताजनक बातमी समोर येतेय. गेल्या 24 तासांत 68 हजार 631 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. संचारबंदी, वीकेंड लॉकडाऊन लागूनही रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात दर तीन मिनिटाला एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती अहवालतून समोर आली आहे.
राज्यात दर तासाला तीन हजार नागरिक कोरोनाबाधित होत असल्याची माहिती समोर आली आहे. संचारबंदी,विकेंड लॉकडाऊन लागूनही रूग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दर मिनिटाला 2 हजार 859 कोरोनाला बळी पडत आहेत.
राज्यात 24 तासांत 68 हजार 631 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 503 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 हजार 654 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून. प्रत्येकाने खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
मुंबईत काल 8 हजार 479 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 53 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात काल 1 हजार 475 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 310 आहे. तर एका दिवसांत 1 हजार 219 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत रविवारी तब्बल ३५ खासगी केंद्रांनी लस साठय़ाअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. त्यामुळे दिवसभरात अर्ध्या संख्येने म्हणजेच 27 हजार 189 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.