माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार

माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर अज्ञात इसमांचा गोळीबार 

Updated: Feb 27, 2020, 08:08 AM IST
माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार  title=

मालेगाव : मालेगांवमध्ये माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. शहराच्या मध्यभागी आणि गजबजलेल्या महेश नगर भागात रिजवान खान रहातात.

रात्री 2 वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या इसमानी खान यांच्या घराची बेल वाजवली मात्र त्यांनी प्रथम खिडकीतून पाहिले असता काही समजण्याच्या हात समोरून गोळीबार करण्यात आला.