Malvan Beach : स्वर्ग पहायचा असेल तर कोकणात चला... कोकण म्हटलं की निसर्गसौंदर्य... पर्यटक इथे निसर्गाचा भरभरून आनंद लुटतात. अथांग सागरी किनाऱ्यावर फिरताना पर्यटक मंत्रमुग्ध होतात. कोकणात एक असाच चमत्कारिक समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनारा रात्रींच्या अंधारात चमकतो. महाराष्ट्रतील हा एकमेव समुद्र किनारा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर हा अद्धबूत नजारा पहायला मिळतो.
भारतात अनेक ठिकाणी असे रात्रीच्या अंधारात चमकणारे समुद्र किनारे पहायला मिळतात. अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीचवर हा नजारा पहायला मिळतो. रात्रीच्या वेळेस हा समुद्र निळ्या-हिरव्या रोषणाईने उजळलेला दिसतो. केरळमधील वर्कला समुद्र किनारा देखील रात्रीच्या अंधारात चमकतो. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात स्थित, मंदारमणी बीच देखील रात्री ताऱ्याप्रमाणे चमकतो. गोव्यातील पालोलेम बीच रात्रीच्या अंधारात चमकतो. तर, महाराष्ट्रातील मालवण समुद्र किनाऱ्यावर देखील असा अद्भूत नजारा पहायला मिळतो.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा सुंदर सूर्यास्त आणि बायोल्युमिनेसेंट पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर निळ्या-हिरव्या रंगात चमकानारा समुद्र पाहण्यासाठी अनेकजण रात्री बोटीतून सफर करतात. रात्रीच्या वेळेस चमकणाऱ्या या समुद्र किनाऱ्यांमागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्याला बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन म्हणतात. समुद्रात असे अनेक जीव आहेत, ज्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो. समुद्रात डाईनोफ्लॅगेट्स नावाचे जीव असतात. हे जीव रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश फेकतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्य पर्यटन समृद्ध जिल्हा म्हमटल्यास वावगे ठरणार नाही. मालवणसह तारकर्ली, देवबाग असे अनेक सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे येथे आहेत. यासह सिंधुदुर्ग यासारखे किल्ले देखील येथे आहेत. यामुळे कोकणची सफर अधिक थरारक आणि अविस्मरणीय होते.
कोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होतंय. गोव्या पाठोपाठ आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागलीय मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला त्याच्या दिमतीला स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि माशाचं मस्त जेवण हे सारं पर्यटकांना भुरळ घालत असतं. त्यामुळे सहाजिकच अलीकडे सिंधुदुर्ग मधील पर्यटकांची संख्या वाढली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथले वॉटर स्पोर्ट्स.. आणि स्कूबा डायव्हींग.. महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलय हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते... पर्यटकांची इच्छी इथं कोकणात पूर्ण होते.. तारकर्लीच्या समुद्रतील रंगीत मासे..पाण वनस्पती... आणि समुद्रातला तळ... सारं काही पाहून पर्यटक हरखून जातात..