Dombivali Crime News: काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत उंबरली गावाजवळ एका प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अवघ्या 48 तासात या हत्येचा उलगडा करत आरोपी विकास पाटील याला अटक केली.
संजय भोईर आणि आरोपी विकास पाटील यांच्यात एका जमिनीच्या मालकी हक्कावरून खूप वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातून संजय भोईर यांनी आपल्याला जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याचा संशय विकासला होता व या संशयातून विकास पाटील याने आपल्या एका साथीदारासह संजय भोईर याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली जवळील उंबर्ली गावात राहणाऱ्या संजय भोईर यांचा मृतदेह गावाजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला होता. संजय भोईर यांची कोणीतरी धारदार शास्त्राने हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत संजय भोईर यांची हत्या का व कोणी केली याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. या हत्येचा उलगडा करण्यासाठी एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांनी या प्रकरणासाठी तीन पथक नेमले होते. तसंच, पोलीस पथकाने तपास सुरू केला, आणि 48 तासाच्या आत मानपाडा पोलिसांनी आरोपी विकास पाटील याला बेड्या ठोकल्या
पोलिसांनी आरोपीला अटक केले असून त्याच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. याबाबत माहिती देताना एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली उंबरली परिसरात वनविभागाची जागा आहे. या जागेसाठी संजय भोईर आणि विकास पाटील यांच्यात वाद सुरू होते. दोघे एकाच गावात राहणारे होते.
दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरु होते विकास पाटील याला संशय होता की, संजय भोईर यांनी त्याला संपवण्यासाठी कुणालातरी सुपारी दिली आहे. या संशयावरून विकास यांनी संजय भोईर याची हत्या करण्याच्या कट रचला. शुक्रवारी रात्री संजय भोईर गावात येत असताना विकास पाटील यांनी आपल्या एका मित्रासोबत त्याला गावाजवळ एका ठिकाणी गाठले. त्यानंतर त्याचावर धारदार शस्त्राने वार केले डोक्यात आणि पायावर झालेल्या गंभीर जखमांमुळे संजय भोईर यांच्या जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले.