'आरक्षण दिलं तर ठिक नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर फक्त...' मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Reservation : मुंबईतल्या 26 तारखेच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, सरकराचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत.

नीतेश महाजन | Updated: Jan 18, 2024, 01:49 PM IST
'आरक्षण दिलं तर ठिक नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर फक्त...' मनोज जरांगेंचा इशारा title=

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शेवटच्या टप्प्यात मराठा समाजात (Maratha Samaj) संभ्रम निर्माण करण्यात येत आहे मराठा समाजाने सध्या कुणावरही विश्वास ठेवायचा नाही.आरक्षण (Reservation) मिळालं तरी 20 तारखेला मुंबईला जायचय आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. आधी 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या त्यांच्या नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र द्या अशी. जिथे जिथे लग्नाच्या सोयरिकी जुळतात त्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीय. मी सांगितलेली व्याख्या सरकारने मसुद्यात घेतली नाही, सरकार तोडगा निघाल्याच्या अफवा पसरवत आहे तोडगा निघलेला नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटंलय. मी मरेपर्यंत हटणार नाही, तुम्ही पक्के आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मला 54 लाख लोकांना 6 दिवसांत प्रमाणपत्र देण्याचं कबूल केलं. 6 दिवसांत प्रमाणपत्र दिले तर आम्ही विजयाचा गुलाल घेऊन जाऊ असं जरांगेंनी म्हटलंय.  आमच्यावर अंतरवाली सारखा प्रयोग कराल तर राजकीय कारकिर्द उद्धवस्त होईल,गोडी गुलाबाने या प्रश्नावर तोडगा काढा, विनाकारण ही गोष्ट लांबवू नका,विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तातडीने 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या, अस जरांगेंनी ठणकावलं आहे. मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, मराठ्यांनी देखील करून घेऊ नका. यांनी माझ्यावर ट्रॅप लावला आहे. 20 तारखेला मराठे अंतरवालीतून मुंबईकडे निघणार, सगळ्यांनी शांततेत चालावे, रस्त्यावर खान्या पिण्याची व्यवस्था करावी असं आवाहन जरांगे पाटील यांनी मरठा समाजाला केलंय.

ज्यांना मुंबईला यायचं नाही, त्यांनी आम्हाला निरोप देण्यासाठी यावं. शिष्टमंडळाचा दोष नाही सरकारचा दोष आहे. सरकरला 7 महिने वेळ दिला, यांनी काही केलं नाही, यांची बैठक झाली, यांच्यातील एक मंत्री आरक्षणाला विरोध करत आहे विनाकारण अफवा करू नका आधी तुमहाला 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्यावं लागेल, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. 

क्युरेटीव्ह पिटीशन बाबत काहीही निर्णय नाही, रेकोर्ड आतापर्यंत किती तपासले ,भाटाचे रेकोर्ड कुठे, कागदपत्रे असताना नोंदी असताना देखील सगळीकडे प्रमाणपत्र दिले जात नाही हे का केले जात आहे? तुम्हाला जनता महत्वाची आहे की अधिकारी.? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आम्ही सन्मान केला आहे, तुम्ही अधिकाऱ्यांना का सुट्ट्या दिल्या, तुम्ही गॅझेट का घेतले नाही ,तुम्ही मराठ्याना वेड्यात काढता का? असा सवाल जरांगेंनी राज्यसरकारला विचारला आहे. 

मुंबईत आल्यावर गोळ्या घातल्या तरी चालेल मी मेलो तरी माझे विचार मरु देऊ नका, आंदोलन सुरू ठेवा, यांचा कोणता ट्रॅप आहे ते बघतो, यांच्या मंत्र्यालाही बघतो, जो मराठा मंत्री रॅलीत येणार नाही त्याला लक्षात ठेवा असं आवाहनही जरांगेंनी केलंय. मराठवड्यात नोंदी कशा काय कमी सापडल्या,जाणून बुजून तुम्ही दाबून ठेवल्या.  ट्रॅप काय आहे हे रॅलीत गेल्यावर सांगीन, आमच्यातील काही असंतुष्ट लोकांना सरकरने हाताशी धरलं आहे. सरकारने या असंतुष्ट लोकांना ताकद देऊन राज्यात कार्यक्रम घेण्याच ठरवलं आहे, जातीच्या नरड्याच घोट घेऊ नका असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा नेत्यांना केलंय. 

आरक्षण मिळालं की मला नेता व्हायचं नाही, मी डोंगरात जातो हिमालयात जातो पण एकवेळ जातींचं कल्याण होऊ द्या. आमच्या मोर्चावर जगाच लक्ष राहील, आमच्या नादाला लागाल, तर देशातील सगळ्या राज्यातील मराठयांना एक करून तुमचा सुपडा साफ करून टाकू, मला फक्त मारून दाखवा, तुम्हाला पूर्वीसारखी लढाई दिसेल. हरियाणा मध्यप्रदेश मधील लोक मला आताच म्हणतात आम्हाला आंदोलनात यायचं आहे. मराठे आता तुमच्या पाठिमागे लागणार ,माझ्या मागे लागाल तर रस्त्यावर आणि गावात बाराही महिने आंदोलन सुरूच राहणार असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

गोडी गुलाबीने 54 लाख लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या. शिष्टमंडळाच्या त्रुटी काढून मी आता थकलो आहे, तुमचं दुखणं काय आहे, मला गोळ्या घालूनच दाखवा आम्ही पिस्तुल घेतले हे कुठे आहे रे अशी टीका त्यांनी भुजबळांवर केली. 
त्याला पदावरून हटवा, जर काही झालं तर त्याला नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जबाबदार धरणार असंही जरांगेंनी म्हटलंय. 

बच्चू कडूवर विश्वास टाकला आहे हे आता एकेक नवीन लोक आमच्याकडे पाठवत आहे, नवीन लोकांना मेळ लागत नाही आणि मलाही काही सुचत नाही ,20 तारखेला मुंबईला जाणार आरक्षण दिलं तर मुंबईतील रस्त्यावर गुडघ्या ईतका गुलाल असेल नाही दिलं तर मुंबईतील रस्त्यावर फक्त मराठे दिसतील. समाजाने यांना 7 महिन्याचा वेळ दिला आहे,आणखी किती वेळ द्यायचा आहे,आता मोर्चा निघण्याच्या वेळेला का दवंडया देत आहे असंही जरांगेंनी म्हटलंय.