मुंबई : मशाल महोत्सवानं शिवरायांचं प्रतापगड उजळून निघालाय. दरवर्षी नवरात्रीच्या चौथ्या माळेला प्रतापगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा गडावरील भावनी मातेच्या प्रतिष्ठापनेला 362 वर्ष पूर्ण होतायेत. त्यानिमित्त गडाच्या बुरूजावर 362 मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.
या मशाल महोत्सवासाठी तळ कोकणातून ते मुंबई, पुण्यातून मोठ्या संख्येनं शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत. ढोल ताशांचा गजर आणि जयभवानी जय शिवाजीच्या जय घोषात मशाल महोत्सव रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.