मुंबई - पुणे रेल्वे प्रवास टाळा, मेगाब्लॉकमुळे गाड्या रद्द

तुम्ही रविवारी मुंबई - पुणे हा रेल्वेने प्रवास करत असाल तर तो टाळा. कारण या मार्गावर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 10, 2018, 10:47 PM IST
मुंबई - पुणे रेल्वे प्रवास टाळा, मेगाब्लॉकमुळे गाड्या रद्द title=

 मुंबई : तुम्ही रविवारी मुंबई - पुणे हा रेल्वेने प्रवास करत असाल तर तो टाळा. कारण या मार्गावर लोणावळा ते पुणे असा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात.

 मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक

सिग्नल यंत्रणा सुधारण्यासाठी मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय. सिंहगड, प्रगती एक्स्प्रेसह लोकल गाड्या रद्द करण्यात आलाय. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेय. 

अनेक गाड्या रद्द

मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक सकाळी ११ वाजून ४०  मिनिटांपासून दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे.

पुणे ते लोणावळ्यादरम्यान ब्लॉक

तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळ्यादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.