MH SET 2023 : महाराष्ट्र "SET 2023" परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 'असे' करा डाउनलोड

MH SET Admit Card Released 2023: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परिक्षा येत्या 26 मार्चला घेण्यात येणार आहे. 

Updated: Mar 19, 2023, 11:43 AM IST
MH SET 2023 : महाराष्ट्र "SET 2023" परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 'असे' करा डाउनलोड title=
MH SET 2023 admit card released

MH SET Admit Card Released 2023: महाराष्ट्र "SET 2023" परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 'असे' करा डाउनलोड : सावित्री फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य पात्रता प्रवेशपत्र म्हणजेच MH SET ADMIT CARD 2023 जारी केले असून ही परीक्षा 26 मार्चला घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एक लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला आहे. जे उमेदवार ही परीक्षा देत आहेत ते अधिकत वेबसाईटला भेट देऊन आणि नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाऊनलोड  करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या setexam.unipune.ac.in या वेबसाईटवरून तुम्हाला हॉल तिकीट पाहता येतील.  जे उमेदवार या SET EXAM 2023 या परीक्षेला बसणार आहेत ते आता Savitribai Phule Pune University (SPPU) च्या अधिकृत वेबसाइटवरुन SET Exam Admit Card 2023 वरून डाऊनलोड करू शकतात. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) अधिकृत वेबसाइट unipune.ac.in वर 38वी MH SET परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत ते त्यांचं आयडी, नाव किंवा अर्ज क्रमांक टाकून MH SET हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी MH SET परीक्षा 26 मार्च 2023 रोजी घेतली जाईल. परीक्षेच्या दिवशी उमेदवाराने सेट प्रवेशपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल. उमेदवारांनी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रवेशपत्रासोबत त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादीसारखे अतिरिक्त फोटो ओळखपत्र पुरावे सोबत ठेवावे. उमेदवारांच्या सोयीसाठी खाली सोप्या स्टेप्स खाली दिल्या आहेत.

असे डाऊनलोड कर प्रवेशपत्र 

  • या https://setexam.unipune.ac.in/ लिंकवर क्लिक करा. 
  • होमपेजवरील Admit Card लिंकवर क्लिक करा
  • त्यानंतर नवीन पेजवर तुमचे लॉगिन तपशील भरा आणि एंटर बटणावर क्लिक करा. 
  • तुम्हाला प्रवेशपत्र संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल 
  • प्रवेश तपासून डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा. 

तसेच महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 असेल. पेपर 1 मध्ये 50 बहुपर्यायी प्रश्न असतील तर प्रत्येकाला 2 गुण असतील. तर, पेपर 2 मध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असेल. दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही.