'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच

Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.   

सायली पाटील | Updated: Jul 4, 2024, 10:15 AM IST
'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच  title=
team india arrival in india Rishabh Pant shares a motivational video of his journey from accodent to t20wc win

Team India T20WC : परराष्ट्रामध्ये जाऊन तिथंही भारताचाच डंका वाजवणारा भारतीय पुरुष क्रिकेट संघ विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर आता खऱ्या अर्थानं आपल्या माणसांमध्ये परतला आहे. मायदेशी परतलेल्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या भावना सध्या पाहण्याजोग्या असून, त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही हेच व्हिडीओ आणि फोटो पाहून लक्षात येत आहे आणि याल गैर काहीच नाही. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीनं या खेळाडूंनी आणि त्यांना साथ देणाऱ्या संघाच्या प्रत्येक सहकाऱ्यानं हे यश संपादन केलं आहे.

संघाच्या या प्रवासाचा हेवा वाटत असला तरीही काही खेळाडूंसाठी, किंबहुना अनेकांसाठीच हा प्रवास सोपा नव्हता. कोणासाठी भावनिक आव्हानं तर, कोणापुढं इतर काही अडचणी उभ्याच होत्या. पण, त्यावर मात करत या पठ्ठ्यांनी बाजी मारलीच. टीम इंडियाचाच भाग असणारा खेळाडू, ऋषभ पंत यावेळी अनेकांना प्रेरणा देऊन गेला. खरंतर ऋषभ अनेकांच्याच कौतुकास पात्र ठरण्याचं कारण म्हणजे  मागील काही महिन्यांपासून क्रिकेटमध्ये परतण्यासाठी त्यानं केलेला संघर्ष. हाच संघर्ष आणि एक सुरेख प्रवास पंतनं सोशल मीजियाच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणला. 

30 डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंत एका भीषण अपघातातून बचावला होता. रुग्णालयामध्ये काही दिवसांसाठी अंथरुणाला खिळून असणाऱ्या याच खेळाडूनं अखेर त्याच्या जिद्दीच्या बळावर शारीरिक अडचणींवरही मात केली. जवळपास 18 महिन्यांच्या संघर्षानंतर संकटांवर टिच्चून उभा राहत ऋषभनं अपेक्षित यश संपादन केलं. 

हेसुद्धा वाचा : Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

 

आपला हा प्रवास खऱ्या अर्थी मागे वळून पाहण्याजोगा होता आणि याच यशासाठी त्यानं नियतीचे आभार मानले. Blessed, Humbled & Grateful असं म्हणत परमात्म्यानं आपल्यासाठी काही खास गोष्टी आखूनच ठेवलेल्या असतात असं सांगत त्यानं कृतज्ञता व्यक्त केली. ऋषभचा हा व्हिडीओ सध्या टीम इंडियाच्या असंख्य व्हिडीओ आणि फोटोंमध्येही स्वत:ची जागा बनवताना दिसत आहे. अगदी त्याचप्रमाणं जशी जागा ऋषभनं संघात कायम केली.... नाही का?