औरंगाबाद महानगरपालिकेत MIM नगरसेवकांचा धुडगूस

औरंगाबाद महानगरपालिकेत पाणी प्रश्नावरून एमआयएमच्या नगरसेवकांची गुंडगिरी पाहायला मिळाली.

Updated: Oct 16, 2017, 06:33 PM IST
औरंगाबाद महानगरपालिकेत MIM नगरसेवकांचा धुडगूस  title=

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेत पाणी प्रश्नावरून एमआयएमच्या नगरसेवकांची गुंडगिरी पाहायला मिळाली.

महापौर पाणीप्रश्नावरील चर्चेला परवानगी देत नसल्यानं एमआयएमच्या नगरसेवकांनी भर सभेत धुडगूस घातला. इतकेच नाही तर, दोन नगरसेवकांनी महापौरांच्या समोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. 

सभागृहातील सुरक्षारक्षकांनी विरोध केल्यानंतर या नगरसेवकांनी त्याला मारहाण केली. सुरक्षारक्षक पळून जात असताना या दोघांनी गुंडांसारखं त्याचा पाठलाग करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. 

महापौर सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाही, राजदंड पळवणारे हे नगरसेवक कुणालाही जुमानत नसल्याचं चित्र औरंगाबाद महानगरपालिकेत दिसलं.