मीरा रोड मध्ये थरार! भर रस्त्यात पत्नीची हत्या

भर रस्त्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे. मीरा रोड मध्ये ही थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे.  मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असलेल्या नया नगर परीसरात ही घटना घडली आहे.  भर रस्त्यात पतीने पत्नीवर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे.

वनिता कांबळे | Updated: Oct 11, 2024, 04:20 PM IST
मीरा रोड मध्ये थरार! भर रस्त्यात पत्नीची हत्या title=

Mira Road Crime News : भर रस्त्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे. मीरा रोड मध्ये ही थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे.  मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असलेल्या नया नगर परीसरात ही घटना घडली आहे.  भर रस्त्यात पतीने पत्नीवर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे.

एन.एच.शाळे समोर रस्त्यातच ही घटना घडली. पती पत्नी दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरु होते. मुलांचा ताबा मिळवण्यासाठी पती पत्नी वाद विवाद सुरु होते. यातुन नेहमी भांडण होत होते.  या रागातूनच पतीने चाकू हल्ला करून पत्नीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरीन खान असे मृत महिलेचे नाव आहे.  महिलेची हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव नदीम खान असे आहे.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास नया नगर पोलिस करत आहेत.

अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केली.

अंबरनाथमध्ये पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी ही घटना घडली पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता. या दोघांचा ३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक वर्षाची मुलगी देखील आहे. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते. याच वादातून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास विकी याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करत गळा चिरून तिची हत्या केली आणि घरातून पसार झाला. याबाबत रात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्रथमदर्शनी चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर आरोपी विकी लोंढे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या घटनेमुळे या दाम्पत्याच्या एक वर्षाच्या चिमुकलीचं मायेचं छत्र मात्र हरपलं आहे.