मामा म्हणून ओळख करुन दिली, पण प्रत्यक्षात तोच होता नवरा; मनोज सानेच्या खुलाशानं मोठा ट्विस्ट

Mira Road Murder Case Update: मिरा रोड हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. आरोपी मनोज सानेने सरस्वतीसोबत लग्न केल्याची कबुली दिली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 9, 2023, 06:34 PM IST
मामा म्हणून ओळख करुन दिली, पण प्रत्यक्षात तोच होता नवरा; मनोज सानेच्या खुलाशानं मोठा ट्विस्ट title=
Mira Road Murder Accused And Victim Were Married with each other

Mira Road Murder Case: सरस्वती वैद्य हत्याप्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. पोलिस जबाबात आरोपी मनोज साने यांने त्याचे लग्न झाले असल्याचा दावा केला आहे. मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी लग्नात लग्न केलं होतं, अशी माहिती डीसीपी जयंत बजबले यांनी माध्यमांना दिली आहे. 

मुंबईलगतच्या मिरारोड परिसरात राहणाऱ्या मनोज साने या इसमाने सरस्वती वैद्य या महिलेची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला मनोज आणि सरस्वती गेल्या सात वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं बोललं जात होतं. दोघांमध्ये झालेल्या भांडणातून मनोजने तिची हत्या केली त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करुन ते कुकरमध्ये शिजवले. तर, काही तुकडे मिक्सरमध्ये बारीककरुन फ्लश केले होते. 

मंदिरात केले लग्न

पोलिसांनी मनोजला अटक केली आहे. मात्र अटकेत असल्यापासून आरोपी सातत्याने आपल्या जबाबात बदल करत असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी मंदिरात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्न केल्याची माहिती फक्त तिच्या बहिणीला होती. 

मनोज आणि सरस्वती दोघांच्या वयातील अंतर जास्त असल्यामुळं त्यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट इतरांपासून लपवून ठेवली होती.  मनोजचे वय ५६ होते तर सरस्वती त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सरस्वतीच्या तीन बहिणी

आत्तापर्यंत या प्रकरणात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. सरस्वतीही अनाथ असल्याचे आत्तापर्यंत बोललं जात होतं. मात्र, सरस्वतीला तीन बहिणी असल्याचे समोर आले आहे. तिच्या तीन बहिणी सतत तिच्या संपर्कात होत्या. पोलिसांनी तिच्या बहिणींचा जबाब नोंदवला आहे. त्यांची डीएनए टेस्टही करण्यात येणार आहे. फॉरेन्सिक तपासणीनंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे अंत्यसंस्कारांसाठी तिच्या बहिणींना सोपवण्यात येणार आहे. 

आरोपीची मामा म्हणून करुन दिली ओळख

अहमदनगरच्या अनाथ आश्रमात सरस्वती लहानाची मोठी झाली होती. तिने अनाथआश्रमात आरोपी मनोजची ओळख मामा म्हणून करुन दिली होती. मी त्यांच्यासोबतच राहते व ते कपड्याचे व्यापारी असून खूप श्रीमंत आहेत, असंही तिने आश्रमातील कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. मागील दोन वर्षांपासून ती दुखी वाटत होती, असंही कर्मचाऱ्यांनी नमूद केलं आहे. 

सात वर्षांपासून एकत्र

मनोज साने याचे बोरिवलीत घर आहे. तर, तिथेच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य राहतात. बोरीवलीतील रेशनिंगच्या दुकानात तो काम करत होता. जिथे साने काम करत होता तिथेच काम करत होता तिथेच त्यांची ओळख झाली. २०१४मध्ये त्यांची ओळख वाढली आणि २०१६पासून ते एकत्र राहायला लागले. तीन वर्षांपूर्वी ते मिरा रोड येथील फ्लॅटमध्ये राहायला गेले होते.