सिग्नल तोडून रस्ता ओलांडण्याची चूक जीवावर बेतली, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाचा मृत्यू... अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

सातारा इथं झालेल्या रस्ते अपघातात कराडमधल्या प्रसिद्ध डॉक्टारांचा मृत्यू झाला. सिग्नल तोडून पुढे जाण्याची एक चूक त्यांच्या जीवावर बेतली. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे

Updated: Jul 6, 2023, 06:10 PM IST
सिग्नल तोडून रस्ता ओलांडण्याची चूक जीवावर बेतली, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाचा मृत्यू... अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

तुषार तपासे,, झी मीडिया, सातारा : सिग्लन (Signal) तोडून रस्ता ओलांडण्याची चूक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाच्या (Pediatrician)जीवावर बेतली. साताऱ्यातल्या कराडमधील डॉक्टरांचा अपघातात (Accident) दुर्देवी मृत्यू झाला. डॉ. चंद्रशेखर औंधकर असं मृत डॉक्टरांचं नाव आहे. डॉ. चंद्रशेखर औंधकर सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरुन दवाखान्यात जात होते. रस्त्यात सिग्नल लागलं होतं, इतर गाड्या सिग्लवर उ्भ्या होत्या. पण डॉ. चंद्रशेखर औंधकर घाईत असल्याने त्यांनी सिग्नल तोडून आपली दुचाकी पुढे नेली.  त्याचेवळी दुसऱ्या बाजूने आलेल्या एसटीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक मारली.

एसटीची ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीसह ते दूर फेकले गेले. या अपघातात डॉ. चंद्रशेखर औंधकर गंभीर जखमी झाले. त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची ही थरारत घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान वाहन चालवताना काळजी घ्यावी अन्यथा काहीही होऊ शकतं अशा आशयाचे मजकूर या व्हिडिओसह सोशल मीडियावर होतंय. डॉ. चंद्रशेखर औंधकर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाची डोंगर कोसळला आहे. 

नागपूरमधील डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू
दोन महिन्यांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist) डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल यांचा अपघातात मृत्यू झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की डॉ. अश्विनी गौरकार आणि डॉ. अतुल गौरकार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने डॉक्टर दाम्पत्याला वरोरा ग्रामीण रुग्णालयात (Varora Rural Hospital) नेण्यात आलं, पण त्याधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मारेगाव इथल्या निवासस्थान आपल्या लहानग्याला ठेवून हे दाम्पत्य कामानिमित्ताने नागपूरला गेलं होतं. पण त्यांचा तो प्रवास शेवटचा ठरला.

मायलेकांचा अपघातात मृत्यू
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभीटोला इथं घडलेल्या भीषण अपघातात मायलेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृतक मोहन बांगरे हा आपल्या आईसह नातेवाईकांकडे जात असतांना कोरंभीटोला येथे भरधाव टिपरने दुचाकीला धडक दिली. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. मोहन बांगरे (24) आणि पुष्पकला बांगरे (55) असे मृतकांची नावे असुन ते दोघेही भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी मोरगाव अर्जुनी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x