अमरावती : आपल्या आंदोलनाने नेहमीच चर्चेत असलेले आक्रमक आमदार आणि शेतकरी नेते म्हणजे बच्चू कडू. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला शासनाची गाडी मिळाली नाही म्हणून बच्चू कडू यांनी आपल्या निधीतून अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांना गाडी भेट दिली तर त्याची परतफेड म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी बच्चू कडू यांना एका कार्यक्रमात चक्क घोडा भेट दिला आहे. यानंतर बच्चू कडूंनी या घोड्यावर फेरफटका तर मारलाच पण आपण शाळेत घोड्यावरुन जात असल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
सध्या अमरावती जिल्ह्यात सर्वत्र या अनोख्या भेटीचीच चर्चा आहे.