मुंबई : विधिमंडळात आज बहुमत चाचणी पार पडण्याआधीच भाजपचे आमदार बाहेर गेले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग न करता नव्या आमदारांसमोर चांगला आदर्श निर्माण करायला हवा होता असा सूर राजकारणातून ऐकू येत आहे. यावरून महाविकास आघाडीने भाजप सरकारला धारेवर धरले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपला टोला लगावला. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपच्या या कृत्यावर टीका केली आहे.
भाजप गोंधळ घालायचाच म्हणून विधिमंडळात आले होते अशी टीका रोहित पवार यांनी केली. केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे काम भाजप करत असल्याचे पवार म्हणाले. परंतु आमच्या तिन्ही पक्षांमधील एकजूट आणि संयम राज्याने पाहिल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे १६९ आमदरांचे बहुमत आहे. पण सर्वच आमदरांनी कुठे आरडाओरड केला नाही ही गोष्ट मला आज शिकायला मिळाल्याचेही रोहीत पवार म्हणाले. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार का ? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय पक्ष लवकरच घेईल असेही ते म्हणाले.
विश्वासदर्शक ठरावादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व आमादारांनी सभात्याग केला. उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजपच्या सर्व आमदारांनी वॉक आऊट केलं. सभागृहाच्या बाहेर भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली.
आज अधिवेशनाला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल चढवला..हे अधिवेशन नियमाला धरून नसल्याचं सांगत कोणत्याही नवीन अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमने होते...मग या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमने का झाली नाही असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. तसंच रात्री १ वाजता अधिवेशनाचं निमंत्रण मिळतं याबाबतही आक्षेप नोंदवला. अधिवेशन हे नियमाला धरून नसल्याचं सांगत अधिवेशन बोलवण्यासाठई राज्यपालांनी समन्स बोलवणं गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.