चंद्रपूर : मुंबईतून सुरु झालेलं मनसेचं मराठी पाट्याचं आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत.
नागपूर चंद्रपूर शहरात आज मनसे कार्यकर्त्यांनी शहरातील तुकूम आणि महामार्ग परिसरातील दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना लक्ष्य केलं..यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी फलके फाडली आणि त्याचबरोबर काही ठिकाणी इंग्रजी पाट्यांना काळे फासले.
या आंदोलनामुळे शहरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.. नियमाप्रमाणे प्रतिष्ठानांवरील नामफलक मराठीत करा अशी मागणी पुढे रेटत मनसेनं व्यापा-यांना 8 दिवसाची मुदत दिलीये.