Crime News : गडबड गोंधळ, आरडा ओरडा आणि... मुंब्रा रेल्वे स्थानकातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

 Crime News :मुब्रा रेल्वे स्थानकातील हा व्हायरल व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली जात आहे. पोलिसांनी या तरुणाला जमावाच्या तावडीतून वाचवले. 

Updated: Mar 13, 2023, 09:50 PM IST
Crime News : गडबड गोंधळ, आरडा ओरडा आणि... मुंब्रा रेल्वे स्थानकातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल title=

Mumbra Railway Station Crime : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. दैनंदिन लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. यामुळे लोकल ट्रेनला आणि रेल्वे स्थानकांवर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळते. याच गर्दीत संधी साधत चोरटे हात सफाई करतात. रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात. अशाच एका मोबाईल चोराला रंगेहात पकडण्यात आले आहे (Mobile phone thief arrested red-handed ). मुंब्रा रेल्वे स्थानकात (Mumbra Railway Station) सापडलेल्या या चोराला बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

मुंब्रा रेल्वे स्थानकात एक तरुण एका महिलेचा मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्या महिलेने आरडाओरडा केला. त्याच दरम्यान रेल्वे स्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशांनी  पळून जाणाऱ्या युवकाला पकडलं आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मोबाईल चोरताना पकडण्यात आलेल्या तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात येत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 

 

रेल्वे स्थानकावर सुरु असलेला गोंधळ आणि आरडाओरडा पाहून मुंब्रा रेल्वे स्थानकात उपस्थित असलेले पोलीस तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ युवकाला जमावाच्या तावडीतून सोडवलं आणि पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी याची झडती घेतली असताना मोबाईल सापडले. 

पोलिसांनी मोबाईल जप्त करत या तरुणाला अटक केली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकात घडली आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला  आहे. दरम्यान पोलिसांनी मोबाईल चोरावर गुन्हा नोंदवला आहे.