मुंबई : वडापाव आणि मुंबईचे अनोखे नाते आहे. मुंबईकरांना आपण वडापावपासून वेगळे करु शकत नाही. तसेच बाप्पा आणि मोदकही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील माणसांच्या अशा दोन आवडीच्या पदार्थांना भारतीय पोस्टाने एकत्र आणले आहे. भारतीय टपाल खात्यातर्फे पोस्टल खात्याच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक या चिन्हांचा उपयोग केला जाणार आहे.
भारतीय टपाल खाते दिवसागणिक कात टाकत आहे. या खात्यातर्फे दरवर्षी नवनवीन पोस्ट तिकिटे सादर केली जात असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील संस्कृती पोस्टर स्टॅम्पच्या माध्यमातून समोर येत असते.
या पोस्टल स्टॅम्पमध्ये हैदराबादी पक्ववांनाचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय डाक विभागाने यापूर्वी तिरुपती येथील लाडू, आंध्र प्रदेश येथील इडली ढोसा टपाल खात्याच्या तिकिटांवर जाहीर केले.
याप्रमाणे पोंगल, दालबाटी, ढोकळा, पेढा याचसोबत मालपोआ, ठेकुआ, संदेश, मोतिचूर लाडू, सरसो का साग, मक्के की रोटी,, गोलगप्पा, राजभोग आदींचा समावेश करण्यात आला आहे.