मॉडीफाईड बाईकची स्पर्धा पोलिसांनी उधळली, 37 बाईक जप्त 71 चालक पसार

मॉडीफाईड बाईकची स्पर्धा पोलिसांनी उधळून लावली आहे. 

Updated: Dec 25, 2020, 07:43 PM IST
मॉडीफाईड बाईकची स्पर्धा पोलिसांनी उधळली, 37 बाईक जप्त 71 चालक पसार title=

सांगली : मॉडीफाईड बाईकची स्पर्धा पोलिसांनी उधळून लावली आहे. कारवाईत 37 बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. 71 चालक मात्र आपल्या बाईक घेऊन पसार झाले. कर्कश्श आवाज करत बाईकची विनापरवाना रेस होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सांगलीवाडी मैदानात धाव घेत कारवाई केली. 

स्पर्धा आयोजकासह 10 ते 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातील अनेक जण कोल्हापूर जिल्ह्यातील असून सांगलीत स्पर्धेसाठी आल्याची माहिती आहे. स्पर्धा पाहण्यात आलेल्यांनाही पोलिसांच्या दांडक्यांचा प्रसाद मिळाला. पसार झालेल्या 71 चालकांचा शोध सुरू आहे.