राम मंदिरबाबत भागवतांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे - पवार

राम मंदिरबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे.

Updated: Sep 21, 2018, 06:47 PM IST

पुणे : राम मंदिरबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे. सरकारने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घ्यायला हवी, अशी मागणी करताना जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

पवारांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या राम मंदिराच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मोहन भागवतांनी ज्या प्रकारे विधान केले आहे त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं ही बाब गांभिर्यानं घ्यायला हवी, अशी मागणी पवारांनी केलीय. 

भागवत हे सरकारचे सल्लागार आहेत आणि देशात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते, असंही पवारांनी नमूद केले आहे. देशाला आज रामायण आणि महाभारताची गरज नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला आहे.