कुत्रा आणि माकडांच्या वादात ग्रामस्थ हैराण, पाहा नेमका काय प्रकार

कुत्रा आणि माकडांच्या वादात ग्रामस्थ हैराण, पाहा नेमका काय प्रकार

Updated: Dec 19, 2021, 01:48 PM IST
कुत्रा आणि माकडांच्या वादात ग्रामस्थ हैराण, पाहा नेमका काय प्रकार title=

बीड : माकड आणि कुत्र्याचं वैर काही आजचं नाही. कुत्रे माकडं दिसली की त्यांच्या मागेच लागतात. मात्र हे वैर एवढ्या टोकावं पोहोचेल याची कल्पनाही कुणी केली नसेल. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 

कुत्र्यांना नुसतं पाहाताच माकडं धूम ठोकतात तिच माकडं आता कुत्र्यांच्या जीवावर उठली आहेत असं फक्त व्हिडीओमध्ये दिसत आहे. कुत्रे आणि माकडांमधलं भांडण या थराला जाईल, असं कुणालाही वाटलं नाही. कुत्रा विरुद्ध माकडं असं गँगवॉर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

माकडांच्या टोळीनं गावात पुरता हैदोस माजवला आहे. माकडांमुळे ग्रामस्थांना घरात घाबरून राहण्याची किंवा रस्ता बदलण्याची वेळ आली आहे. ही माकडं कधी  माणसांवर हल्ला करतील याचा नेम नाही. पण ही माकडं अशी नेमकी का वागत आहेत. याची अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. 

प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडीओ बीडमधील असल्याचं सांगितलं जात आहे. माकडं आणि कुत्रे यांच्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वारंवार वन विभागाकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता ग्रामस्थही वैतागले आहेत.

Fact Check : माकडं आणि भटक्या कुत्र्याच्या 'त्या' व्हिडीओमागील सत्य

तर माकड आणि कुत्र्याचं वैर असल्याचा बनाव असल्याचंही काही लोकांचं म्हणणं आहे. व्हायरल व्हिडीओची झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही. यामागे नेमकं काय कारण आहे याचा शोध सुरू आहे.