Nashik News : तीन लेकरांसह 50 टक्के भाजली, छत उडालं संसार उघड्यावर... ही काय वेळ आलीय या माऊलीवर

  तीन लेकरांसह 50 टक्के भाजली, छत उडालं संसार उघड्यावर...  ही काय वेळआलीय या माऊलीवर. नाशिकमध्ये घडलेली घटना पाहून सगळेचजण हळहळ व्यक्त करत आहेत(Nashik News). सिलिंडर स्फोटानं नाशिक हादरले आहे. या घटनेत एका महिलेसह या तिची तीन मुलं जखमी झाली आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता या स्फोटात महिलेचे घर उद्धवस्त झाले आहे(gas cylinder explosion in Nashik).  

Updated: Jan 9, 2023, 06:12 PM IST
Nashik News : तीन लेकरांसह 50 टक्के भाजली, छत उडालं संसार उघड्यावर... ही काय वेळ आलीय या माऊलीवर  title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक :  तीन लेकरांसह 50 टक्के भाजली, छत उडालं संसार उघड्यावर...  ही काय वेळआलीय या माऊलीवर. नाशिकमध्ये घडलेली घटना पाहून सगळेचजण हळहळ व्यक्त करत आहेत(Nashik News). सिलिंडर स्फोटानं नाशिक हादरले आहे. या घटनेत एका महिलेसह या तिची तीन मुलं जखमी झाली आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता या स्फोटात महिलेचे घर उद्धवस्त झाले आहे(gas cylinder explosion in Nashik).  

नारायण बापूनगरमधलील  एका चाळीत हा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. स्वयंपाक करत असताना हा स्फोट झाला. त्यामध्ये आईसह तीन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. तिन्ही मुलांना शाळेत सोडण्याआधी त्यांची आई त्यांचा डबा तयार करत होती. त्याचवेळी सिलिंडरचा स्फोट झाला.

स्फोट एवढा भीषण होता की त्यामुळे घरावरचे पत्रे उडाले. वॉशिंग मशिन, भांडी, कपडे यासह घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त झाले.  महिलेसह तीन मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटात महिलेची प्रकृती गंभीर आहे. ती पन्नास टक्के भाजली आहे. 

नारायण बापूनगर येथे लोखंडे मंगल कार्यालयासमोर पुंजाजी लोखंडे यांच्या मालकीची पत्र्याची चाळ आहे. या चाळीतील खोल्यांमध्ये अनेक भाडेकरी राहतात. त्यात मोलमजुरी करणार्‍या भाडेकरूंचा समावेश आहे. आज सकाळी या चाळीतील एका घरामध्ये सुगंधा सोळंकी (वय 24) ही महिला मुलांना शाळेत जायचे असल्याने त्यांना चहा. नाश्ता तसेच जेवणाचा डबा तयार करून देण्याच्या कामात व्यस्त होत्या. यावेळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडाले, तसेच स्फोटामुळे लागलेल्या आगीत सुगंधा सोळंकी या 50 टक्के भाजल्या असून, त्यांची तीन मुले जखमी झाले आहेत. रुद्र (वय 5) हा 15 टक्के भाजला आहे. तर, आर्यन (वय 7)  आणि सूर्या (वय 4) ही दोन मुले पाच टक्के भाजली आहेत. 

लोखंडे चाळीत स्फोट झाल्याची माहिती कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या महिलेसह तिच्या मुलांना प्रथम बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तिच्या मुलांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या स्फोटात महिलेचा संपूर्ण संसारच उघड्यावर पडला आहे.